तालुका प्रतिनिधी/मनोजकुमार राठोड.
भोकर / राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.विजय भाऊ सुर्यवंशी यांच्या संमतीने व राज्य कार्याध्यक्ष मा.संपादक शंकरसिंह ठाकूर यांचे सुचनेवरुन सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,कृषि व पत्रकारिता यांसह आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले संपादक उत्तम बाबळे यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या पत्रकारांच्या राज्य आणि देशव्यापी संघटनेच्या राज्य संघटक पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून भोकर तालुका अध्यक्ष पदी गंगाधर पडवळे तर सचिव पदी बालाजी कदम यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र देऊन पुढील भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
दि.१७ जून २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह भोकर येथे संपन्न झालेल्या बैठकीत राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली सर्व सन्माननिय सदस्य यांची एक संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत मागील वर्षी चा अहवाल सर्वसमोर मांडून नूतन कार्यकरणी निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी सर्वांचे मत जाणून घेऊन सर्वानुमते शांत, संयमी, हुशार, उच्चशिक्षित,अभ्यासू, वेळप्रसंगी तितकेच आक्रमक,असणारे,निष्कलंक व्यकतिमत्व सर्वच क्षेत्रात ज्यांची एक मित्र म्हणून ओळख निर्माण केलेले व याआधी संघात कार्याध्यक्ष, सचिव पदाची यशस्वी धुरा सांभाळून संघाला नावलौकिक,मिळवून देणारे, त्याच बरोबर उपक्रमशील व्यक्ती गंगाधर पडवळे यांची निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्ष प्रा. राहुल कदम,सचिव म्हणून बालाजी कदम, उपाध्यक्ष साईनाथ बंडोड,कोषाध्यक्ष विशाल जाधव, सहकोषाध्यक्ष मनोजकुमार राठोड,समन्वयक विनय दुर्केवार, सहसचिव भावीन शेठ, संघटक गजानन गाडेकर,तर सदस्य म्हणून संभाजी कदम, श्रीकांत बाबळे, निळकंठ पडवळे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष संपादक मारोती शिकारे,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राठोड, शुभमसिंह ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या सर्व पदाधिकाऱ्यांची ही उपस्थिती होती.तर संपादक उत्तम बाबळे, तालुका अध्यक्ष गंगाधर पडवळे, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कदम,सचिव बालाजी कदम,उपाध्यक्ष साईनाथ बंडोड व सर्वच पदाधिकारी सदस्य यांच्या नियुक्तीचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
सदरील बैठकीत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे माननीय अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी यांची संकल्पना कार्य याची जाणीव सर्व संघातील सदस्यांना करून दिली त्याचबरोबर कार्य उद्दिष्ट आणि कर्तव्य, अधिकार याचेही वाचन सर्वांसमोर करण्यात आले. यानंतर पत्रकार म्हणून समाजात वावरत असताना अनेक संकटांशी सामना करावा लागतो त्याचबरोबर परिवाराही जपावा लागतो यासाठी पत्रकार संघ शासन स्तरावरून पत्रकारांच्या हिताचे निर्णय त्याचबरोबर फायदे करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही बोलण्यात आले. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून संविधानिक मार्गाने कर्तव्य हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्व मिळून लढा देऊ अशी ग्वाही देऊन सर्वांना आश्वासित करण्यात आले.
