भोकर पोलीसांनी अवैध विक्रीसाठी नेत असलेले ६० किलो गोवंश मांस पकडले

 














भोकर तालुका प्रतिनिधी / मनोजकुमार राठोड 

दोघांविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल 

भोकर : राज्यात गोवंश हत्त्या व मांस विक्रीस बंदी असतांनाही गोवंश तस्करी आणि हत्तेच्या माध्यमातून गैर प्रकारे मांस विक्री केली जात आहे.याच प्रकारातून दुचाकीवरुन गोवंश मांस अवैधरित्या विक्रीसाठी नेत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन भोकर-मुदखेड रस्त्यावरील रिठ्ठा गावाजवळ एका दुचाकीवरून ६० किलो गोवंश मांस विक्रीसाठी नेत असलेल्या दोघांना भोकर पोलीसांनी पकडले असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        भोकर पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की,दि.२९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजताच्या दरम्यान भोकर येथून मुदखेड रस्त्याने एका दुचाकीवरून गोवंश मांस अवैधरित्या विक्रीसाठी नेले जात आहे.ही माहिती मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या आदेशाने जमादार भिमराव जाधव व पो.कॉ.सुदर्शन येकुलवार यांनी तात्काळ त्यांचा शोध घेतला असता भोकर-मुदखेड रस्त्यावरील रिठ्ठा ता. भोकर या गावाजवळ दुचाकीवरून गोवंश मांस विक्रीसाठी नेत असलेले दोघे मिळून आले.यावेळी त्यांना दुचाकी व गोवंश मांसासह ताब्यात घेतले.चौकशी केली असता त्यांची नावे बाबा लतिफ खाटीक,रा. मुधोळ गल्ली भोकर व सलीम नुरखान शेख,सईद नगर,भोकर असे असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्या जवळील ६० किलो गोवंश मांस व एम.एच.२६ सी.डब्ल्यु.९०३७ क्रमांकाची युनिकॉर्न दुचाकी आणि त्या दोघांना ताब्यात घेऊन भोकर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.तसेच सेवारत पो.कॉ.सुदर्शन येकुलवार यांनी फिर्याद दिल्यावरुन बाबा लतिफ खाटीक व सलीम नुरखान शेख या दोघांविरुद्ध गु.र.नं.५१२/२०२५ कलम ५(क),९(अ), १० महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा प्रमाणे भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास जमादार भिमराव जाधव हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने