भोकर तालुका प्रतिनिधी
मनोजकुमार राठोड
*नागापूर फाट्यावर भीषण अपघात आईचर च्या धडकते स्कुटीस्वार अंगणवाडी सेविकाचा फरफटत नेत जागीच मृत्यू*
भोकर- म्हैसा या राज्य महामार्गा पुन्हा एकदा अपघाताची मालीका सुरूच असून या महामार्गावर झालेल्या एका आयचर वाहनाने समोरुन येणार्या स्कुटीला नागापूर पाटीजवळ जोराची धडक देत चिंचाळा पर्यंत फरफटत आणल्याने यात स्कुटी स्वार अंगणवाडी सेविकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घटली आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार भोकर तालुक्यातील मौजे खडकी येथील अर्चना गोविंद शिंदे वय २९ वर्ष जे की या अंगणवाडी कार्यकर्ता म्हणून कार्यरत होत्या.त्या दिवसभर गावातील कामे आटोपून भोकर येथील तहसील मध्ये ३ वाजता होणाऱ्या बैठकीसाठी म्हणून आपली स्कुटी क्रं.एम एच २६ सीडब्ल्यू १९६१ भोकरला जाण्यासाठी निघाली. नागापुर पाटीजवळ येताच भोकरहुन म्हैसाकडे भरधाव वेगात जाणाऱ्या आयचर वाहण क्रं.एमएच ४१ एटी १८१९ धडक दिली.आणी स्कुटीसह अर्चना शिंदे चिंचाळा पाटी पर्यंत फरफटत नेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हि घटना दि.२३ जुन २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघाने शिंदे कुटुंबावर मोठा आघात झाला असुन त्यांच्या पश्चात नवरा, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे समजते. या घटनेने खडकी परिसरात अंगणवाडी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.यावेळी आयचर वाहणाचा चालक नशेत असल्याचे सांगण्यात आले. या वेळी स.पोलीस निरीक्षक शैलेंद्र आवटे हे घटनास्थळी दाखल झाले.


