भोकर तहसील कार्यालयावर धडकली बंजारा समाजाची निवेदन रॅली.








तालुका प्रतिनिधी/ मनोजकुमार राठोड.

(हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला तातडीने एसटी आरक्षण द्या.)

भोकर –हैदराबाद गॅझेट नुसार अनुसूचित जमाती मधून बंजारा समाजाला आरक्षण देण्यात यावे .या मागणीसाठी भोकर तहसील कार्यालयावर 10 सप्टेंबर रोजी बंजारा समाजाच्या वतीने पारंपारिक वेशभूषेत तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. संत सेवालाल महाराज नंगारा भवन या नियोजित स्थळी याडी जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराज यांची पूजा करून मोर्चाची सुरुवात झाली .तहसील कार्यालय पर्यंत हजारो बंजारा समाजातील पुरुष ,महिला आणि मुले यांनी प्रचंड संकेत मोर्चा काढला .पारंपारिक पोशाखातील मोर्चात सहभागी झालेल्यांनी हैदराबाद गॅजेट मधील तरतुदींना अनुसरून आरक्षण मिळावे असे फलक हातात घेण्यात आले होते. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या आणि हैदराबाद गॅझेट लागू करा असे घोषणा केले. बंजारा आरक्षण समितीचे अध्यक्ष रमेश राठोड, मोहन राठोड, सखाराम राठोड, डॉ. राम नाईक जाधव, दिलीप जाधव, बालाजी जाधव, विशाल जाधव, मनोज राठोड, धोंडू राठोड, प्रफुल राठोड,ज्ञानेश्वर राठोड, यांनी मोर्चामध्ये सक्रिय सहभाग घेतला, डॉ. उत्तम जाधव, डॉ. राम नाईक जाधव, डॉ. अरविंद चव्हाण, डॉ. शिवाजी पवार आदींनी प्रखर विचार मांडले. तहसीलदार विनोद गुंडमवार यांना सामूहिक निवेदन देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने