भोकर (ता. प्रतिनिधी)
भोकर : महाराष्ट्र सरकारने प्रस्थापित मराठा समाजाला हैद्राबाद गंँजेट लागू करून ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याने सकल ओबीसी समाजात संतापाची लाट निर्माण झाली असून सरकार कडून काढण्यात आलेल्या जी.आर.ची होळी करून आंदोलन छेडण्याचा इशारा भोकर तालुका सकल ओबीसी समाजाने दिला आहे.
भोकर तालुका सकल ओबीसी समाजा कडून दि. 3 सप्टेंबर 25रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारा मार्फत दिलेल्या निवेदनात असे म्हटले की महाराष्ट्रातील मराठा समाज हा जमिनजुमलेदार व आर्थिक दृष्टया गडगंज असुन त्यांच्याकडे कारखाने बँका शैक्षणिक संस्था मंत्री आमदार खासदार मोठ्या प्रमाणात आहेत.18 पकड जातीत विखुरलेला ओबीसी भटक्या आलुतेदार बलुतेदार समाजाला संविधानिक रित्या दिलेले अधिकार मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाज संघटित होऊन महागड्या हजारो गाड्या घेऊन मुंबईला आंदोलन करीत सरकारवर दबाव टाकतो हा समाज गरीब कसा असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास सकल ओबीसी समाज महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा ओबीसी बांधवांच्या वतीने दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.व केवळ ओबीसीचे आरक्षण बळकवण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने मुंबई येथे आंदोलन करत ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा आणली आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचा जो जीआर सरकारने काढला आहे तो रद्द करावा व जीआर चा योग्य तो सखोल अभ्यास सरकारने करावा असे निवेदन भोकर तहसील येथे तहसीलदार यांना देण्यात आले. असून
निवेदनावर ओबीसी नेते नागोराव शेंडगे, डॉ. उतम जाधव,राजेश करपे, बी.आर. पांचाळ,माधव करेवाड, अपाराव राठोड, सुरेश बिलेवाड, दता पांचाळ, सुनील चव्हाण, सुभाष नाईक, संदीप गौड, व्यंकट वर्षेवार, बालाजी भोंबे,श्रीनिवास लामगे,खंडेराव शेंडगे,बालाजी नारलेवाड, आदिच्या सह्या आहेत.
