भोकर येथे महिला आरोग्य शिबीर- मा. मुख्यमंत्री खा. अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन करण्यात येत आहे.

 







तालुका प्रतिनिधी / मनोजकुमार राठोड 

भोकर येथे महिला आरोग्य शिबीर मा.मुख्यमंत्री तथा खा.अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि.26/10/2025 रोजी रविवार भोकर येथे जीवन ज्योत सामाजिक संस्था भोकर व गंगा हॉस्पिटल नांदेड यांच्या संयुक्त विद्यामाने महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा बहुसंख्येने गरजूने लाभ घ्यावा असे आव्हान डॉ.असोसिएशन भोकरचे मा. तालुकाध्यक्ष तथा जीवन ज्योत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.राम नाईक जाधव यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवस दि. 28 सप्टेंबर रोजी आहे. त्यांचा वाढदिवस लोकोपयोगी व समाजसेवी उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्याच्या उद्देशाने जीवन ज्योत सामाजिक संस्था भोकर व गंगा हॉस्पिटल नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता ते दुपारी 2 वाजता पर्यंत डॉ.राम नाईक जाधव यांचे जीवन ज्योत हॉस्पिटल किनवट रोड भोकर येथे महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात महिलांसाठी आरोग्य तपासणी स्त्रीरोग तपासणी (Gynec check up), मासिक पाळीतील अनियमितता तपासणी, पांढरा स्त्राव (Leucorrhoea) तपासणी, PCDO/PCOS तपासणी, गर्भाशयातील विकार तपासणी बध्यत्व (INFERTILITY) सल्ला, ब्रेन कॅन्सर प्राथमिक तपासणी, रजोनिवृत्ती (MENOPAUSE) सल्ला, हिमोग्लोबिन तपासणी (HB), मधुमेह तपासणी (SUGAR), रक्तदाब तपासणी (BP), आधीची तपासणी तज्ञ डॉक्टरकडून केली जाणार आहे. व महिला तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य सल्लाही देण्यात येणार आहे. आणि मोफत औषधी वाटप देखील करण्यात येणार आहे .तरी या शिबिरात चा लाभ गरजूंनी बहुसंख्येने घ्यावा असे आव्हान डॉ.असोशियन भोकरचे मा.तालुकाध्यक्ष तथा जीवन ज्योत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. राम नाईक जाधव यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने