भोकर, दि. ०४/१०/२०२५
अपघाताने मृत्यू: पावलेल्या बँक ऑफ बडोदा शाखा भोकर येथे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेस अंतर्गत खातेधारक स्वरूपा सखाराम कदम यांची पती श्री. सखाराम कदम यांना दोन लाखांचा विमा लाभ
भोकर: येथील बँक ऑफ बडोदा शाखेच्या खातेधारक स्वरूपा सखाराम कदम (राहणार: सोनारी) यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पती श्री. सखाराम कदम यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत दावा दाखल केला. संबंधित बँक शाखेतील कर्मचाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्वरित पाठपुरावा केला, ज्यामुळे दावा लवकरच मंजूर झाला.
भोकर येथील बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्राचे संचालक गजानन गुरुपवार यांनी या प्रकरणाचा विशेष पाठपुरावा करून विमा रक्कम मंजूर करून आणली. स्वरूपा कदम यांना दोन मुले (एक मुलगा व एक मुलगी) असून, या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी हा विमा लाभ महत्त्वाचा ठरला आहे.
दावा मंजुरीनंतर भोकर येथील बँक ऑफ बडोदा मुख्य शाखेचे अधिकारी लिंगन्ना सुदेवाड व स्टाफ अरविंद ब्यागलवार (BCS), शिवहर अन्नपवाड (CBC) तसेच जिल्हा व्यवस्थापक सचिन संगेकर यांनी वारस असलेल्या पती श्री. सखाराम कदम यांना २ लाख ररुपयांची विमा रक्कम स्वाधीन केली. या प्रक्रियेत बँकेच्या सर्व अधिकाऱ्यां व कर्मचाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत खातेधारकांना अपघातातील मृत्यूसाठी २ लाख रुपयांचा विमा लाभ मिळतो. ही योजना शासन व बँकेच्या माध्यमातून विविध सुविधा पुरवते. ग्राहकांनी स्वतः जागरूक राहून PMSBY, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊन कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
खातेधारक स्वरूपा कदम यांची जीवितहानी ही मोठी असली तरी, पश्चात कुटुंबाला मिळालेला हा आर्थिक लाभ दिलासादायक आहे.
केंद्र शासनाच्या या योजनेवरील जनतेचा विश्वास वाढत असल्याचे यामुळे पुन्हा एकदा दिसून आले.
