श्री सेवालाल गड देवस्थान भोकर येथे विवाह सोहळा.

 





भोकर : मनोजकुमार राठोड 

दि.३१ अक्टोंबर शुक्रवार रोजी श्री. सेवालाल गड देवस्थान भोकर येथे वर चि. प्रदीप रोहिदास राठोड रा. दुर्गानगर तांडा ता.उमरी जि. नांदेड वधू शीतल बालाजी जाधव रा. दुर्गानगर तांडा ता.उमरी जि. नांदेड या नव दांपत्याचे विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने करुन समाजात चांगले आदर्श निर्माण केला आहे या विवाह सोहळ्यास मुख्याधिकारी हरिकल्याण ऐलगट्टे साहेब उपस्थित राहुन लग्न सोहळ्यात उपस्थित ३०० पाहुण्यांच्या जेवणाचा खर्च केला आहे. या कार्यक्रमास गडाचे पुजारी लचीराम महाराज, गडाचे व्यवस्थापक तथा धर्मगुरू रामराव महाराज यांचे सेवक बाळु महाराज, नायक रामचंद्र राठोड, कारभारी गुलाब पवार, बंजारा पुकार पेपर चे संपादक अविनाश गोविंदराव चव्हाण, साहेबराव जाधव, भिमराच राठोड, सोमा महाराज, सुरेश जाधव, मारोती राठोड, कविता राठोड, मलुबाई राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री सेवालाल गड देवस्थान येथे हा सातवा विवाह सोहळा पार पडला आहे भोकर परिसरात हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. बंजारा बांधव मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने