तालुका प्रतनिधी / मनोजकुमार राठोड
उमरी तालुक्यातील शेतकरी विद्यार्थी शाळकरी व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात भोकर तालुक्याला बाजारपेठेसाठी शिक्षणासाठी आरोग्य सेवेसाठी अनेक नागरिक जात असतात परंतु तसे बघितले तर कोल्हा ढोल उंबरे पळसगाव कारला कळगाव कारला तांडा कळगाव तांडा सावरगाव हसापूर हाडोळी हा मार्ग अनेक गावांना जोडणारा असून एकेकाळी या रस्त्यावर दोन दोन बसेस महामंडळ चालायच्या आणि महामंडळाला त्याचा परिपूर्ण महसुली मिळायचा परंतु मधल्या काळात काही रस्त्याच्या अडचणी असल्याकारणाने कोल्हा ते भोकर जाणारी बस सेवा बंद करण्यात आली होती. परंतु नागरिकांची गैरसोय ध्यानात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमरी तालुका अध्यक्ष श्रीपत पाटील साळुंखे यांनी आज संबंधित विभागाला लवकरात लवकर महामंडळ बस सेवा सुरू करण्यात यावी यासाठी पत्र देऊन कळविले परंतु वरिष्ठ महामंडळ अधिकारी या पत्राची दखल लवकरच घेतील काय आता या भागातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी ,व्यापारी हे मात्र लक्ष ठेवून आहेत परिवहन विभागाने तात्काळ भोकर ते कळगाव ते कोल्हा मार्गे बस सेवा सुरू करावी अशी मागणी जोर धरताना दिसत आहे.
