उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांची घेतली भेट–भोकर खा. रवींद्र चव्हाण यांनी

 






तालुका प्रतिनिधी /. मनोजकुमार राठोड 

भोकर–सुधा प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी संपादित केलेल्या 37.7 हेक्टर जमिनीचा मावेजा न मिळाल्याने आमरण उपोषण ला बसलेल्या शेतकऱ्यांना उपोषण स्थळी खासदार रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली. कोंडेकर तालुका अध्यक्ष गोविंद बाबा गोंड पाटील, शिवसेना उभाठाचे अध्यक्ष संतोष आलेवार ,प्रहार अध्यक्ष शेखर कुंटे ,उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी ,तहसीलदार विनोद गुंडमवार ,पोलीस निरीक्षक अजित कुंभार ,आदीसह काँग्रेस सह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्यांनी उपस्थिती होती. भोकर तालुक्यातील सुधा प्रकल्पाची उंची वाढण्यासाठी सहा गावातील शेतकऱ्यांचा जमीन बुडीत क्षेत्रात गेल्या मात्र अद्यापही शासनाकडून त्यांना मावेजा मिळाला नसल्याने दिनांक 9 पासून संबंधित गावाचे शेतकरी उप विभागीय कार्यालय समोर आमरण उपोषण साठी बसले गेले आहे. या संदर्भामध्ये खासदार रवींद्र चव्हाण यांनी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली व सर्व समस्या जाणून घेतली,मी आपला खासदार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीमागे सदैव खंबीरपणे उभा राहणार  असे  खासदार चव्हाण यांनी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने