*हरित क्रांतीचे प्रणेते म. रा. मा.मुख्यमंत्री महानायक स्व.वसंतराव नाईक साहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा चे साक्षीदार होऊया –पत्रकार मनोजकुमार राठोड*

भोकर तालुका प्रतिनिधी- मनोजकुमार राठोड 


भोकर–समस्त बंजारा समाज बांधव 26 मे 2025 सोमवार रोजी नांदेड येथे होणाऱ्या हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, महानायक ,स्व.वसंतराव नाईक साहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा साठी देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब , महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब , महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे साहेब, आमदार बाबूसिंग महाराज,भोकर विधानसभा चे आमदार श्रीजया ताई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महानायक वसंतराव नाईक साहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असून या अनुषंगाने सर्व समाज बांधव हजारोंच्या संख्येने लोकार्पण सोहळा पुतळा अनावरण सोहळा कार्यक्रमासाठी नांदेड येथे उपस्थित रहावे. या भव्य दिव्य कार्यक्रमाची शोभा वाढवावी व मोठ्या संख्येने जमून कार्यक्रमाचे साक्षीदार बनूया. बंजारा समाजातील सर्व महिलांनी पारंपरिक वेशभूषा पद्धतीने या कार्यक्रमांमध्ये उपस्थित रहावे असे आव्हान जय सेवालाल झेरॉक्स & मल्टी सर्व्हिसेस चे मालक तथा पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता भाजपा भोकर मनोजकुमार देविदासराव राठोड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने