तालुका प्रतिनिधी/ मनोजकुमार राठोड.
भोकर –मुख्यमंत्री शंभर दिवसाच्या प्रशासकीय सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत पोलीस स्टेशन भोकर या कार्यालयाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत मराठवाडा विभागात द्वितीय स्थान मिळवले आहे. शंभर दिवसाची कार्यालयीन सुधारणाची विशेष मोहीम विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेली महाराष्ट्रातील तालुकास्तरीय शासकीय कार्यालय दुसराटप्पा या क्रमांकाचा निकाल दिनांक 16 मे रोजी जाहीर झाला आहे. नांदेड पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा महाराष्ट्र शासनाने आढावा घेऊन पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या नेतृत्वाखाली विविध सर्वांगीण सर्वोत्कृष्ट उपक्रम राबविणाऱ्या भोकर पोलीस स्टेशन या कार्यालयास सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल छत्रपती संभाजी नगर मराठवाडा विभागातून दुसरा क्रमांकाने सन्मानित करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत नांदेड पोलीस दलाचे वेबसाईटचे अद्यावतीकरण करण्यात आले. इज ऑफ लिविंग ची सुरुवात करण्यात आली .त्या अंतर्गत नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने पेट्रोलिंग ची सुरुवात करण्यात आली .त्या अनुषंगाने शहरात एकूण 754 व ग्रामीण भागात एकूण 731 ठिकाणी टी कोट्स लावण्यात आले. तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले. व शनिवारी तक्रार निवारण दिन साजरा करून ,आज 1811 तक्रारीचे निवारण करण्यात आले. नांदेड जिल्हा पोलीस दलातील सर्व कार्यालयात दर मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .कार्यालयातील सर्व जुने रेकॉर्ड याची छाननी करून आवश्यक रेकॉर्ड जतन करण्यात आले .त्याचे अ ,व ,ब रेकॉर्ड करून निर्गती केली. अभिलेख कक्षाची सफाई करून अभिलेखाची अ ब क ड पद्धतीने वर्गवारी करण्यात आली .जुन्या वाहनाचे लिलाव करण्यात आले. मुद्देमालाचा पंचनामा करून मुद्देमान नष्ट करण्यात आले .जिल्हा पोलीस दलाच्या कार्यालयात पिण्याचे पाणी स्वच्छता ग्रहाची स्वच्छता, सर्व कार्यालयात दिशादर्शक फलक कार्यालयाचे परिसराचे सुशोभीकरण .सुसज्ज प्रतिक्षालय या सोयी सुविधा करण्यात आल्या. गुंतवणूक प्रसार करण्यात आला कोचिंग क्लासेस व सर्व क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्यात आल्या. ऑपरेशन बीट कनेक्ट राबविण्यात आले. मिशन उडान, ऑपरेशन वारसा जतन, नांदेड पोलीस लीग, मिशन निर्भया ,मिशन समाधान, मिशन निर्धार ,मिशन एकता ,असे उपक्रम राबविण्यात आले.
