भोकर-(तालुका प्रतिनिधी) मनोजकुमार राठोड -
शहरात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करण्याचे प्रकार सुरू असून 24 डिसेंबरच्या रात्री भोकर भैसा मार्गावर हायवा ट्रक मध्ये रेती भरून येत असताना भोकर पोलिसांनी पकडून 6 लाख 25 हजार रुपयांचा ट्रक जप्त केला.
भोकर शहरात गेली अनेक दिवसापासून रात्रीच्या वेळी रेती व मुरुमाची अवैध वाहतूक करून रात्रीच्या वेळी हा धंदा सरळ चालतो. यावर्षी 3 दिवसांपूर्वी महसूल विभागाने हायवा ट्रक जप्त केला होता २४ डिसेंबर च्या पहाटे 2 वाजण्याच्या दरम्यान भोकर भैसा पॉईंटवरून रेती वाहून नेणारा हायवा ट्रक पोलिसांना मिळून आला. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार , अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराया धरणे, सुरज जाधव, उपअधीक्षक शफकात अमना यांच्या आदेशानुसार सपोनी शैलेंद्र औटे, यांच्यासोबत पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कळणे ,प्रमोद जोंधळे, मंगेश क्षीरसागर ,गुरुदास अरेवार, यांनी या कामी परिश्रम घेतले. 25 हजाराची रेती आणि 6 लाख रुपये किमतीचा हायवा जप्त करून पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला आहे.
