भोकर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील लेखापाल, मोगले लाच लुचपत पथकाच्या जाळ्यात.






भोकर -(मनोजकुमार राठोड) - 

                  घटनेतील तक्रारदार यांनी दि. 04/12/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे हजर येवून तक्रार दिली की, तक्रारदार हे कंत्राटी आरोग्य सेवक आहेत. त्यांचे महिन्याचे पगार बिल काढण्याचे काम कंत्राटी इलोसे यांच्याकडे होते. तक्रारदार यांचे माहे ऑगस्ट/2024, सप्टेंबर/2024 व ऑक्टोबर/2024 या तीन महिन्याचे काढलेल्या पगारीचे मोबदला म्हणुन 4,500/- रुपयाची मागणी इलोसे यांनी केली. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांचे पगार बिल काढणार नाही म्हणून नाईलाजास्तव इलोसे मोगले यांना 3,000/- रुपये दिले. त्यानंतर इलोसे हे तक्रारदार यांना उर्वरीत राहिलेले 1,500/- रुपये लाचेची मागणी वारंवार करीत होते. सदरची रक्कम ही लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने त्यांनी याबाबत ला.प्र.वि. नांदेड कडे तक्रार दिली. त्यावरून दि. 04/12/2024 रोजी ला.प्र.वि. नांदेड युनिटच्या पथकाने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर येथील कंत्राटी लेखापाल आशिष मोगले यांचेवर केलेल्या पडताळणी कार्यवाहीत इलोसे आशिष मोगले यांनी तक्रारदार यांना शासकीय पंचा समक्ष 1,500/- रुपये लाचेची मागणी करुन लाच रक्कम स्वीकारण्याची संमती दिली.

दि. 19/12/2024 रोजी शासकीय पंचा समक्ष करण्यात आलेल्या सापळा कार्यवाहीत इलोसे आशिष मोगले यांनी तक्रारदार यांचे कडुन 1,500/- लाच रक्कम स्वीकारली आहे.

     यातील आरोपी इतर लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असून पो.स्टे. भोकर, ता. भोकर जि.नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मा.श्री संदीप पालवे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड. मा.डॉ. संजय तुंगार, अपर पोलीस अधीक्षक अँटीकरप्शन ब्युरो नांदेड परिक्षेत्र, नांदेड पर्यवेक्षण अधिकारी श्री, प्रशांत पवार पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड सापळा व तपास अधिकारी श्रीमती माधुरी यावलीकर,पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड सापळा कारवाई पथक सपोउपनि गजेंद्र मांजरमकर, पोह/शेख रसुल, पोकॉ/रापतवार, चापोह/रमेश नामपल्ले, सर्व नेम. अँटी करप्शन ब्युरो टीम, नांदेड. नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारीध्कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने