संपादक मनोजकुमार राठोड
भोकर - तेलंगणा येथील बंजारा समाजातील नामवंत व राजकीय क्षेत्रात गाजलेले मा. राजेश बाबू दिनांक 13 फेब्रुवारी वार गुरुवार रोजी भोकर येथे त्यांचे आगमन झाले.
बासर येथे होणाऱ्या भव्य दिव्य महा रॅली मोर्चा बंजारा समाजाकडून होणाऱ्या या उपदेशाने दीक्षा गुरु प्रेमसिंग महाराज यांच्या आदेशाने समस्त बंजारा समाज हजारोच्या संख्येने 16 फेब्रुवारी रोजी बासर तेलंगाना येथे उपस्थित रहावे .असे आवाहन बंजारा समाजांना केले आहे. या औचित्य साधून तेलंगाना येथील सन्माननीय राजेश बाबू यांनी यासंदर्भात भोकर तालुक्यात भेट दिली व तसेच तालुक्यातील प्रत्येक तांड्यातील लोकांना त्यांनी तातडीची बैठक घेतली . आज घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये भोकर तालुक्यातील प्रत्येक तांड्यातील प्रतिष्ठित नागरिक हजेरी लावली . येणाऱ्या 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भव्य दिव्य महा मोर्चा साठी राजेश बाबू यांनी आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक बंजारा समाज बांधवांना आमंत्रण केले आहे .की आपण सर्व हजारोच्या संख्येने बासर येथे 16 फेब्रुवारी रोजी उपस्थित रहावे. व तसेच दीक्षा गुरु प्रेमसिंग महाराज यांच्या आदेशाला आपण सन्मान करू... व तसेच शासनापर्यंत आपली बुलंद आवाज पोहोचण्याचा काम आपण करू. तसेच डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राम नाईक यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली.. या बैठकी मध्ये भोकर तालुक्यातील सर्व बंजारा समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित झाले. व तसेच राजेश बाबू यांचे समाजाकडून त्यांचा सत्कार करण्यात आले....
एकच नारा... एक दिवस समाजासाठी
चलो बासर.... चलो बासर... ही संकल्पना मनामध्ये ठेवून आपण सर्वांनी 16 फेब्रुवारी रोजी हजारोच्या संख्येत उपस्थित राहावे असे राजेश बाबू यांनी म्हणाले.....
