पोलीस स्टेशन भोकर येथे मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तर यावेळी शहरी व ग्रामीण भागातील सर्व पत्रकार मोठे संख्येने उपस्थिती होते.दर्पणकार आचार्य बाळशास्त्री यांची जयंती व दर्पण दिनानिमित्त भोकर पोलीस स्टेशन तर्फे उपस्थित सर्व पत्रकाराचे पोलीस निरीक्षक श्री अजित कुंभार साहेब , तसेच एपीआय आऊटे साहेब, पीएसआय सुरेश जाधव साहेब यांनी पेन व डायरीसह पुष्पहार देऊन सत्कार केले . तसेच पोलीस निरीक्षक अजित कुंभार साहेब यांनी म्हणाले की पत्रकार ची लेखणी म्हणजे समाजातील जडणघडण व अन्यायाला वाचा फोडणारे एक शस्त्र म्हणून पत्रकारांनी सत्तेची बाजू मांडून धरावे व निर्भीडपणे समाजाच्या हितासाठी आपली पत्रकारिता करावी. भलेही कदाचित आमचेही प्रशासनाचेही काही चुकत असल्यास स्पष्टपणे ते आपल्या लेखणीतून जगासमोर आणावे व त्यासाठी आपल्याला काही अडचणी आल्या सदैव मी सेवेत तत्पर आहे. असे प्रतिपादन त्यावेळी बोलताना कुंभार साहेब यांनी केले.
पोलीस स्टेशन भोकर येथे मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती निमित्त सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
byमुख्य संपादक मनोजकुमार देविदासराव राठोड
-
0
