आमदार श्रीजयाताई चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा - भाजपचे अँड. विनोद चव्हाण चिदगिरीकर यांची मागणी.
भोकर, दि. २ (प्रतिनिधी) - माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या कन्या ॲड. श्रीजयाताई चव्हाण यांचा भोकर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय झाला. चव्हाण कुटुंबीयांनी आजपर्यंत भोकर विधानसभा मतदारसंघातून राज्याचे नेतृत्व केल्याची परंपरा आहे. त्यामुळे ॲड. श्रीजयाताई चव्हाण यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी, भाजपचे अँड. विनोद चव्हाण चिदगिरीकर यांनी केली आहे.
मागील काही दिवस नांदेडसह राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. २३ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल लागला. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या कन्या ॲड. श्रीजीयाताई चव्हाण यांचा ५० हजारांच्या मोठ्या मताधिक्याने विजय झाला. उच्चशिक्षित असलेल्या श्रीजयताई चव्हाण यांनी कायद्याचेही शिक्षण घेतले आहे. मागील काही वर्षांपासून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सोशल मीडियाची जबाबदारी श्रीजयायाताई चव्हाण ह्या सांभाळत आहेत. तसेच भोकर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना भेटी देऊन त्यांनी मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेत सोडविण्यासाठी पुढाकार घेतला होता. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आणि भाजपकडून श्रीजयाताई चव्हाण यांना भोकर विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली. यापूर्वी माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, अशोकराव चव्हाण व अमिताताई चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. शंकराव चव्हाण व अशोकराव चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघातून राज्याची यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली आहे. त्याप्रमाणेच भोकर विधानसभा मतदार संघाचाही मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. भोकर विधानसभा मतदारसंघ हा जवान कुटुंबीयांचा बालेकिल्ला म्हणून पूर्वीपासून ओळखला जातो. यंदाच्या निवडणुकीत श्रीजयाताई चव्हाण यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाल्यामुळे भोकर विधानसभा मतदारसंघ हा आजही चव्हाण कुटुंबीयांचाच बालेकिल्ला म्हणून शिक्का मोर्तब झाला आहे. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व अशोकराव चव्हाण यांच्या तालमीत व संस्कारात वाढलेल्या श्रीजयाताई चव्हाण यांना गोरगरिबांसह सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आलेल्या श्रीजयाताई चव्हाण यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात यावा, अशी मागणी अँड. विनोद चव्हाण चिदगिरीकर यांनी केली आहे.
---------
Devendra Fadnavis BJP Maharashtra Chandrashekhar Bawankule Ashok Chavan भाजपा किसान मोर्चा, Adv Sreejaya Ashok Chavan
