भोकर( मनोजकुमार राठोड )-
दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघाचे आमदार संजय भाऊ राठोड हे 2004 ते 2024 पर्यंत दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून येणारे बंजारा समाजाचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने वासुदेव राठोड यांनी केली आहे.
सन 2004 हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आ.संजय भाऊ राठोड यांच्या वर विश्वास दाखविला आणि तात्कालीन गृहमंत्री माजी.आ.माणिकराव ठाकरे यांचा तब्बल 22 हजार मतांनी पराभव करत विजय मिळवला होता. आ.संजय भाऊ राठोड हे 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारणाच्या जोरावरच सलग पाच वेळा आमदार झाले आहेत. 2009 साली खा.संजय देशमुख यांना तब्बल पन्नास हजार मतांनी पराभव केले आणि सर्वाधिक मतांनी येणारे बंजारा समाजाचे एकमेव आमदार ठरले तर नुकत्याच झालेल्या 2024 विधानसभा निवडणुकीत मा.आ.माणिकराव ठाकरे यांना 51000 हजार मतांनी पराभव केले आहे.त्यामुळे आ.संजय भाऊ राठोड यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील तमाम बंजारा समाजाच्या वतीने वासुदेव राठोड यांनी केली आहे.
