26 -11 हल्ल्यातील शहीदांना भोकर पोलिसांची अनोखी श्रद्धांजली- ठाण्यातील ३५ पोलिसांनी केले रक्तदान शिबिर.
भोकर: प्रतिनिधी
भोकर पोलीस ठाण्यात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील विर हुतात्म्यांना ३५ रक्त दात्यांनी रक्तदान करून व मेणबत्ती लावून आदरांजली वाहिली.
भोकर पो.स्टे चे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर पोलीस ठाण्यात मंगळवारी दि. २६ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. मुंबई: २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.थरकाप उडवून देणाऱ्या या घटनेला आज १५ वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांनी ताज हॉटेल आणि ट्रायडेंट हॉटेलबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात १६६ नागरिकांना जीव गमवावा लागला होता. तर, मुंबई पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांना वीरमरण आलं होते या शहिद विरांना श्रद्धांजली म्हणून भोकर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वतिने या शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन भोकरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत अमना यांच्या हस्ते झाले.यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी शफकत अमना यांच्या सह पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांच्या सह सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड,शैलेन्द्र औटे,पि.एस. आय.सुरेश जाधव,कराड ,दिलीप जाधव, परमेश्वर गाडेकर पोलीस कॉन्स्टेबल आदी अधिकार्यांनी उपस्थिती लावून रक्तदान केले .
या वेळी जिवन आधार रक्तपेढी नांदेड यांच्या वतीने रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. यासाठी पि.आर.ओ नारायण मस्के, टेक्निशियन सुपरवायझर बालाजी आमिलकंठवार,असिस्टंट टेक्निशियन गोपाल मुंगल,आनिल चाळणेवाड यांनी रक्त संकलन करण्यासाठी पुढाकार घेतला.
या शिबिराला भोकर पोलीस ठाण्यातील महिला व पुरुष पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील,होमगार्ड आदिंनी मोठा प्रतिसाद विर हुतात्म्यांना आपली श्रद्धांजली वाहिली.
