*प्रवीण चव्हाण यांच्या सह अनेक कार्यकर्ते भाजप पक्षाला करणारा राम राम-प्रवीण चव्हाण चिदगिरीकर*
भोकर- प्रतिनिधी ( मनोजकुमार राठोड)
भोकर-सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले तसेच भारतीय जनता पार्टीमध्ये एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून कार्य केलेले आदरणीय प्रवीण भाऊ चव्हाण तसेच यांच्यासह अनेक कार्यकर्ते आता काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार. बंजारा समाजात व इतर समाजात त्यांचा चांगलाच दबदबा असून ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत . पक्षासाठी रात्र दिवस काम केले आहे. एक चांगल्या प्रकारे काम करून सुद्धा त्यांना व कार्यकर्त्यांना कुठेतरी डावळण्याचा प्रयत्न कुठेतरी चालू असल्याचे त्यांनी सांगितले कुठेतरी नाराज असल्याने त्यांच्या संपर्कातील नाराज असलेले सरपंच व कार्यकर्ते जवळपास 20 ते 25 सरपंच व शेकडो कार्यकर्ते लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असे त्यांनी निर्णय घेतलेला आहे. लवकरच विधानसभा निवडणूक जवळ आले असून आता अनेक उमेदवार आपापल्या ताकतीने निवडणूक लढण्यासाठी काम करत आहे परंतु काही ठिकाणी निष्ठावंतपणे काम करणारे कार्यकर्ते कुठेतरी नाराजी व्यक्त करत आहे. असे चित्र दिसून येत आहे. त्यापैकी एक प्रवीण चव्हाण हे एक सामाजिक कार्यकर्ते असून तसेच चिदगिरी तांडा येथील तंटामुक्त अध्यक्ष असून तसेच बंजारा लमान तांडा वस्ती चे अशासकीय पदावर सदस्य म्हणून त्यांची निवड सुद्धा करण्यात आली आहे . त्यांचा जनसंपर्क प्रचंड मोठा असून त्यांच्या संपर्कामध्ये असलेले अनेक कार्यकर्ते व तसेच अनेक सरपंच यांच्या पाठीमागे असल्याचे सांगून त्यांनी लवकरच काँग्रेस पक्षांमध्ये जाहीर प्रवेश करणार असे त्यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.
