अशोकरावांनी घेतला चिखलीकराकडुन झालेल्या पराभवाचा बदला-जनतेत खुलेआम चर्चा







भोकर/प्रतिनिधी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पराभव केल्यामुळे तो पराभव त्यांना मोठ्या प्रमाणात जिव्हारी लागला होता. त्यांनी आपल्या पराभवा विषयी मनोगत व्यक्त करताना त्याकाळी म्हणाले होते की राजकारणात जय पराजय होत असतो त्याचे मला दुःख नाही.या निवडणुकीमध्ये मी ईतर कुणाकडूनही पराभूत झालो असतो तरी त्याची मला खंत वाटली नसती परंतु चिखलीकरांसारख्या माणसा मुळे मला पराभवाला सामोरे जावे लागले याची सर्वात मोठी खंत मला बोचत आहे. हे आयुष्यभर विसरू शकणार नाही. योगायोगाने आता काँग्रेस सत्तेतच येणार नाही या भीतीपोटी अशोक रावांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि राज्यसभेची खासदारकी मिळवली. भाजपच्या कोर कमिटीने नांदेडला प्रतापराव चिखलीकर यांना तिकीट न देण्याचा विचार पक्का केला होता परंतु अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये आल्याने त्यांना तिकीट भेटले. नांदेड हिंगोली लातूर लोकसभेच्या तिन्ही उमेदवारांना निवडून आणणार असा आत्मविश्वास त्यांनी जाहीर सभेतून पक्षाच्या नेत्यांना दिला होता. परंतु अशोकरावांच्या भाजप प्रवेशामुळे जनतेत प्रचंड नाराजीचा सूर पसरला आणि या तिन्ही लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे तिन्ही उमेदवार प्रचंड मतांनी पराभूत झाले पण योगायोगाने त्यांनी केलेला संकल्प चिखलीकरच्या पराभवानी पूर्ण झाला की काय? अशी चर्चा नागरिकांतून होताना दिसून आली. काँग्रेसच्या विजयाचा भोकरमध्ये जल्लोष

नांदेड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांनी भरघोस मतांनी विजय संपादन केल्याने भोकर शहरात ढोल ताशाच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजी करत गुलाल उधळून काँग्रेसच्या कार्यक त्र्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, अॅड. शिवाजीराव कदम, काँग्रेस शहराध्यक्ष तौसीफ इनामदार, शिवसेना ऊबाठा, चे सतीश देशमुख, अॅड, परमेश्वर पांचाळ, महिला अध्यक्ष, सुरेखा माळे, यशोदा शेळके, शकुंतला कदम, चंद्रकला गायकवाड, कमल नर्तावार, सुरेखा गजभारे, मनोरमा किनीकर, यासहसर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने