भोकर ( मनोजकुमार राठोड )
चला चला भोकरला आज महायुतीची विजय संकल्प रॅली.
विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज रविवार भोकर येथे महायुतीची विजय संकल्प रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीमध्ये मोठे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न युतीच्या माध्यमातून केला जाणार आहे. रॅली नंतर सभा होईल सभेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख मार्गदर्शक आहेत. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाबू सिंग महाराज राठोड ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष सचिन साठे यांच्यासह उमेदवार श्रीजया चव्हाण आधीची उपस्थिती राहणार आहे.
