भोकर प्रतिनिधी
मनोजकुमार राठोड
तब्बल ३३ वर्षानंतर बाबूसिंग महाराज यांच्या रूपाने पोहरादेवीला आमदार मिळाला आहे. आज भारतीय पक्षाच्या कोट्यातून बाबू सिंग महाराज यांनी विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली.
सन 1978 मध्ये माजी आमदार अनंत कुमार पाटील हे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवडून आले अनंत कुमार पाटील यांच्या रूपाने पहिल्यांदा पोहरादेवीला आमदार मिळाले होते. अनंत कुमार पाटील हे विधानसभा आणि नंतर विधान परिषद सदस्य झाले ते तब्बल 11 वर्ष आमदार होते तेव्हा त्यांनी पोहरादेवी विकासाचा पाया रचला होता. 1978 पासून खऱ्या अर्थाने पोहरादेवीच्या विकासाला सुरुवात झाली. काही वर्षापासून विद्यमान मंत्री संजय राठोड यांनीही पोहरादेवी विकासाचा ध्यास घेतला असून नंगारा वास्तू संग्रहालय,सेवालाल महाराज मंदिर बांधकाम ,संत रामराव महाराज मंदिर बांधकाम, सह अनेक विकासाची कामे केली आहे .तीर्थक्षेत्र पोहरादेवी हे संत सेवालाल महाराज यांचे समाधी स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे संपूर्ण भारतातून दररोज शेकडो भाविक भक्त येथे समाधीचे दर्शनासाठी येतात .बाबू सिंग महाराज हे संत रामराव महाराज यांचे उत्तर अधिकारी म्हणून गादीवर विराजमान आहेत. त्यांना विधान परिषद वर सदस्य म्हणून घेतल्याने महाराष्ट्र सह तेलंगाना, कर्नाटक राज्याच्या राजकारणावर परिणाम होणार आहे.
