रेणापूर परिसरात वीज पडून एका गाईचा जागीच मृत्यू

 





भोकर तालुका प्रतिनिधी - मनोजकुमार राठोड

भोकर तालुक्यातील मौजे. रेणापुर येथे दि १२ /०५ /२०२४ दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास  शेतात बांधलेल्या गायीवर  विज कोसळली अन् यात गाय मृत पावल्याची घटना घडली आहे.

   भोकर तालुक्यात दि.१२ मे रोज रविवारी दुपारी ३ च्या सुमारास वादळी वार्यासह अवकाळी पाऊस झाला.यातच विजेचा कडकडाट होऊन मौजे. रेणापुर येथील शेतकरी आबाजी शिवाजी कोळेकर यांच्या शेतात बांधलेल्या गायीवर वीज कोसळली अन् गाय जागीच मरण पावली आहे.शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने