MTV MARATHI NEWS
मुख्य संपादक :- मनोजकुमार देविदासराव राठोड
मो. 8766883257
भोकर तालुका प्रतिनिधी - भाजपाच्या तांडा वस्ती संपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक डॉ. मोहन चव्हाण यांची महाराष्ट्रातील चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या स्टार प्रचारक पदी नियुक्ती करण्यात आली आहे,
प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे. डॉ चव्हाण हे भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असून ओबीसी मोर्चाच्या वतीने नांदेड लोकसभा मतदार संघ प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत.लोकसभा निवडणुकीत राज्यातील विविध वस्ती व ताड्यावर जाऊन भाजपा व महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी पक्षाचे स्टार प्रचारकाच्या माध्यमातून त्याच्यावर टाकण्यात आली आहे.डॉ मोहन चव्हाण यांनी नुकत्याच लातूर लोकसभा मतदार संघातील उदगीर तसेच सोलापूर व उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध तांड्यावर जाऊन कॉर्नर बैठका घेतल्या आहेत, या कामाचा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय दररोज अहवाल पाठविण्यात येत असल्याचे डॉ मोहन चव्हाण यांनी सांगितले.
