*श्री क्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा भवन संग्रहालय तयार.*
(पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार अनावरण.
भोकर-बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथील बंजारा समाजाच्या गौरवशाली इतिहासाची नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी श्री क्षेत्र पोहरादेवी येथे विरासत ए बंजारा संग्रहालय उभारले जात आहे. त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून येत्या 5 ऑक्टोंबर रोजी प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वास्तु संग्रहालयाचे अनावरण केले जाणार आहे.
पोहरादेवी येथे नंगारा प्रतिकृती वास्तु संग्रहालयाचे निर्माण कार्य तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रसंत रामराव महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा 3 डिसेंबर 2018 रोजी सुरू झाला. या 6 वर्षानंतर हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून 5 ऑक्टोंबर 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच साधुसंत, महंत ,मृद जलसंधारण मंत्री संजय राठोड व इतर मंत्राच्या उपस्थिती सोहळा आयोजित केला जाणार आहे .या सोहळ्याला बंजारा समाज बांधव जास्तीत जास्त संकेत उपस्थित राहावे असे अव्हान भोकर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे पत्रकार विशाल भाऊ जाधव, प्रफुल राठोड, किशोर भाऊ जाधव, पत्रकार मनोज भाऊ राठोड, राहुल जाधव, प्रभाकर राठोड, सखाराम राठोड, यांनी जनतेस आव्हान केले आहे.

