धावरी करांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहिला आहे - अरुण चव्हाण

धावरी तांडा येथे अरुण भाऊ चव्हाण यांचे जल्लोषात स्वागत 


भोकर ( मनोजकुमार राठोड )- समाजासाठी आपलं जीवन त्याग करून अविवाहित राहून आपलं आयुष्य समाजहितासाठी अर्पण करणारे अरुण भाऊ चव्हाण यांचा भोकर तालुक्यातील धावरी तांडा येथे दि १२ सप्टेंबर रोजी विशाल ताफ्यासह आगमन झाले.धावरी तांडा येथील गावाकऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

     गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण यांनी नुकताच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असून सलग एक महिना पूर्ण होऊन गेला आहे. एकही दिवस आराम न करता प्रत्येक विधानसभा मधील तांडा, गाव, वस्ती सर्व ठिकाणी आपल्या भेटीगाठी संपर्क चालू केला आहे आणि सर्वच ठिकाणी अरुण भाऊ चव्हाण यांचा गावकरी मोठ्या उत्साहात स्वागत करताना दिसून येत आहेत. दि १२ सप्टेंबर रोजी भोकर तालुक्यातील धावरी तांडा येथे मा.अरुण भाऊ चव्हाण त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते  धावरी तांडा येथे आपल्या ताफ्यासह दाखल झाले.यावेळी गावकऱ्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली.सर्वप्रथम गावकऱ्यांकडून अरुण भाऊ चव्हाण यांचा बंजारा समाज संस्कृती पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

      पारंपरिक लोकगीत गाऊन महिला कडून त्यांचा सत्कार करण्यात आला. ढोल ,ताशाच्या आवाजाने अरुण चव्हाण यांचे जंगी स्वागत करण्यात आले.सेवालाल महाराज, जगदंबा देवी या मंदिर पर्यंत त्यांची पायी रॅली देखील काढण्यात आली. या रॅलीमध्ये तांड्यातील सर्व नागरिक महिला सहभागी झाले होते.धावरी तांडा येथील प्रमुखांकडून चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. 

     तसेच गोरसेना जिल्हा उपाध्यक्ष रमेश राठोड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.शब्दसुमनाने सर्व पाहुण्यांचे व कार्यकर्त्यांचे त्यांनी स्वागत केले. गोरसेना जिल्हा अध्यक्ष पापाराव चव्हाण यांनी अरुण भाऊ चव्हाण यांच्या विषयी आपले मत मांडले.

     

यानंतर अरुण चव्हाण यांनी आपले मनोगत गावकऱ्यासोबत व्यक्त केले. धावरीकरांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहिला आहे आणि इथून पुढे देखील मला आपल्या सर्वांचा आशीर्वाद रहावा त्यासाठी मी आपल्या घरी आलो आहे .आपला एक मुलगा म्हणून मला साथ द्या.संधीच सोनं करू आणि हे विशालगड आपण जिंकू. मला आपल्या सर्वांची साथ खूप मोलाची आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संघटनेमध्ये समाजासाठी दिवस रात्र काम केले आहे आणि करत राहील.परंतु आपला आवाज बुलंद करण्यासाठी मला राजकारणात उतरावं लागलं.न्याय हक्क मिळवण्यासाठी मला हे निर्णय घ्यावे लागले. असे अरुण चव्हाण यांनी तांड्यातील लोकांना संबोधित करताना म्हटले . 


     संधी मिळाल्यावर नक्कीच युवा तरुणांसाठी त्यांचा भविष्य बदलणाऱ्या काळाची निर्मिती करण्याचा मानस आहे.युवा तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार आहे.सभामंडप,नाली ,घरकुल,शौचालय तसेच मूलभूत गरजा पूर्ण करुन विकास साधायचा आहे.सदैव मी जनतेसाठी काम करणार, विकासासाठी काम करणार असे उद्गार धावरी येथे बोलताना अरुण चव्हाण यांनी काढले

.


 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने