दि.१५,१६,१७ ऑगस्ट आज सलग तीन झाले आहे सतत पाऊस चालू आहे शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मोघाळी मंडळातील मौजे मोघाळी, हाळदा, धारजनी,धारजनी फुलवाडी तांडा, धारजनी कुदळा तांडा, धारजनी सोसायटी तांडा, बल्लाळ मोठा तांडा मसाईनगर तांडा, बेंद्री, ईळेगाव, नांदा बु., कामनगाव, हाडोळी, बेंबर, हसापुर, रायखोड, सायाळ, डौर आदी गावात अति मुसळधार पाऊस झाला. अजुन ही सतत धार पाऊस चालुच आहे. या होणाऱ्या पावसा मुळे नदी नाल्याना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. या आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन, तुर, हळद, ज्वारी आदी खरिपांची पिके मोठ्या प्रमाणात खरडून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेव्हा संबंधित विभागाने या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत करावी अशी मागणी मोघाळी मंडळातील शेतकरी बांधवाकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.
तालुका प्रतिनिधी (मनोजकुमार राठोड).
गेल्या दोन दिवसापासून मोघाळी मंडळात सतत मुसळधार पाऊस होत असल्यामुळे अनेक नदी नाल्यांना मोठा पूर आला असून नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनीतील खरीपाची पिके वाहून जाऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

