एसबीआय शाखेच्या 70 व्या स्थापनेच्या दिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल मातुळ येथे वृक्षारोपण करून साजरा केला वर्धापन दिन.

 









तालुका प्रतिनिधि / मनोजकुमार राठोड 

*एस.बी.आय.शाखेचे शाळेत वृक्षारोपण*

मातुळ:- एसबीआय शाखेच्या 70 व्या स्थापनेच्या दिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल मातुळ येथे वृक्षारोपण करून साजरा केला वर्धापन दिन.

मातुळ येथील एसबीआय शाखा ही परिसरातील सोळा लहान -मोठी दत्तक गावाचे आर्थिक देवाणघेवाण करण्याचे मुख्य केंद्र असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा व महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ देऊन महिला सक्षमीकरण करत ,सामाजिक बांधिलकी जपताना शाखा अधिकारी प्रकाश मुळे यांनी जिल्हा परिषद हायस्कूल मातुळ येथे वृक्षारोपण करून आपला 70 वा बँक वर्धापन दिन साजरा केला.

"पर्यावरण जपण्यासाठी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करावे" असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी एस.बी.आय. शाखेचे कर्मचारी प्रवीण मडावी, अतुल बोंद्रे, अमोल बोईनवाड, नागेश उदगिरे, अजिज शेख, तुळशीराम कदम, दिगंबर कदम, जिल्हा परिषद हायस्कूल मुख्याध्यापक अशोक कदम, गांनलावाड सर, पानगे सर, पुजरवाड सर, व गावातील उपसरपंच माधव बोईनवाड ,सामाजिक कार्यकर्ते गंगाधर जकलवाड व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. गावकऱ्यांनी एस.बी.आय. शाखेच्या कार्याचां गौरव केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने