मातुळ येथे पाचवे राज्यस्तरीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन २८ फेब्रुवारी रोजी
खा. प्रा. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते २८ रोजी होणार उद्घाटन; संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रो. डॉ. गजानन देवकर यांची निवड
आ. ॲड. श्रीजया चव्हाण, शिरिषभाऊ गोरठेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार
मातुळ: - रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने भोकर तालुक्यातील मातुळ येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती व सप्तरंगी साहित्य मंडळ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येत्या २८ फेब्रुवारी रोजी सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पाचव्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे नांदेड लोकसभेचे विद्यमान खा. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रो. डॉ. गजानन देवकर यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनासाठी भोकरच्या आ. अॅड. श्रीजया चव्हाण, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. जगदीश कदम, माजी कृषी सभापती बाळासाहेब रावणगांवकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उमरीचे सभापती शिरिषभाऊ गोरठेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव पाटील मातुळकर यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, सरपंच सविता कदम, उपसरपंच माधव बोईनवाड, पो.पा. लक्ष्मण बोईनवाड, चेअरमन मधुसूदन पवार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम डांगे, पोस्ट मास्तर आनंद सुर्यवंशी, युवा नेते बबलू मातुळकर, माजी स्वागताध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, निमंत्रक प्रल्हाद हिंगोले, शिक्षण विस्तार अधिकारी सुमन गोणारकर, जिपहाचे मुख्याध्यापक पी. एस. मिस्त्री, गंगाधर जक्कलवाड, श्यामसुंदर बोईनवाड, मारुती भोकरे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष सतीश मातुळकर, निमंत्रक बालाजी सूर्यतळे आणि मुख्य संयोजक दत्ताहरी कदम यांनी दिली. दिवसभरात ग्रंथदिंडी, चित्र व नाणी प्रदर्शन, पुरस्कार वितरण, परिसंवाद, प्रकाशने, कथाकथन, गझलसंध्या, कविसंमेलन, ठराववाचन अशा विविध सत्रांतून साहित्य संमेलन संपन्न होणार असल्याने जय्यत तयारी सुरू आहे.
सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाचे पाचवे राज्यस्तरीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन भोकर तालुक्यातील मातुळ येथे संपन्न होत आहे. हे संमेलन छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित असून या संमेलनाची सुरुवात २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. ग्रंथदिंडीने होईल. त्यानंतर मुख्य समारंभ संपन्न होईल. उद्घाटन समारंभानंतर ज्येष्ठ विचारवंत बालाजी थोटवे यांच्या अध्यक्षतेखाली 'छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेतीविषयक धोरण आणि आजचे वास्तव' विषयावरील परिसंवादात अॅड. गंगाधर साळवे, गजानन वानखेडे, दगडू भरकड हे चिंतक आपले विचार ठेणार आहेत. दु. ४.०० वा. कथाकथन होईल. यात सुप्रसिद्ध कथाकार दिगांबर कदम यांच्या अध्यक्षतेखाली राम तरटे, स्वाती कान्हेगांवकर, भारत दाढेल, आ.ग. ढवळे हे आपल्या स्वरचित आणि सुरस कथाकथनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. त्यानंतर गझलसंध्या हा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकारांचा कार्यक्रम होईल. यात आत्तम गेंदे, यशवंत मस्के, रोहिणी पांडे, स्वाती भद्रे, अंजली मुनेश्वर, दिपाली कुलकर्णी, सतीश देशमुख, जयराम धोंगडे, निशा डांगे, विजय वाठोरे, विजय धोबे, रघु देशपांडे हे गझलकार सहभागी होतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्माराम जाधव हे असतील. यानंतरच्या सत्रात सुप्रसिद्ध कवी गजानन हिंगमिरे यांच्या अध्यक्षतेखाली ५० कवींचे कविसंमेलन संपन्न होणार आहे. यात प्रमुख अतिथी कवी म्हणून बी. जी. कळसे, रुचिरा बेटकर, युवा कवी सोनू दरेगावकर यांची उपस्थिती राहणार आहे तर समारोपीय सत्रात संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष, निमंत्रक व सप्तरंगी साहित्य मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ठराव वाचन होणार आहे.
दरम्यान, जनसंवाद विशेषांकाचे प्रकाशन व इतर प्रकाशने होणार असून मिलिंद जाधव, साहेबराव डोंगरे व संतोष तळेगावे यांचे चित्र व नाणी प्रदर्शन होणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील कार्यरत मान्यवरांना जनसंवाद विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यात जितेंद्र देशमुख, शिरीष लोणकर, सुभाष गड्डम, शिल्पाताई लोखंडे, संगिता नेत्रगावे, नागोराव लोखंडे, प्रा. ओमपप्रकाश मस्के, गंगाधर मिसाळे यांचा समावेश आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सप्तरंगी साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, सचिव कैलास धुतराज, कार्यालयीन सचिव मारोती कदम, कोषाध्यक्ष शंकर गच्चे, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, राज्य समन्वयक बाबुराव पाईकराव, महिला विभाग प्रमुख रुपाली वागरे वैद्य, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, सचिव चंद्रकांत कदम, यशवंत भवरे, उमेश वंजारे, प्रकाश ढवळे नागलगांवकर, राहुल जोंधळे, यशवंत क्षीरसागर, प्रल्हाद घोरबांड, पंडित पाटील बेरळीकर, संजय भारदे, शिवाजी गोडबोले, जळबा सोनकांबळे, गौतम कांबळे, विशालराज वाघमारे, सुभाष लोखंडे, शैलेश कवठेकर यांच्यासह सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
चौकट
संमेलनस्थळ परिसराला ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे नाव भोकर तालुक्यातील मौ. मातुळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सप्तरंगी साहित्य मंडळाचे पाचवे राज्यस्तरीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन होणार असून या संमेलनाच्या स्थळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव तर संमेलनाच्या परिसरास कालकथित ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे नाव देण्यात आले असून संमेलनाच्या प्रवेशद्वाराला मातुळ येथील स्वातंत्र्यसैनिक कै. विठ्ठल गंगाराम कदम यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच विचारपिठाला बुधभूषणकार छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. काव्यमंचाला संत जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात आले आहे.
